मराठा... त्या काळी फक्त जात नसून विचार होता; 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाचा ट्रेलर (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकDharmarakshak Ahilyadevi Holkar Movie: मराठा... त्या काळी फक्त एक जात नसून एक विचार होता; 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाचा चित्तथरारक ट्रेलर

Dharmarakshak Ahilyadevi Holkar Movie: याच थोर महाराणींची यशोगाथा 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर - एक युग' या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 23 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

By : नामदेव जगताप|Updated at : 13 May 2025 01:19 PM (IST)

मराठा... त्या काळी फक्त जात नसून विचार होता; 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाचा ट्रेलर (1)

Dharmarakshak Ahilyadevi Holkar Movie

Source :

ABP Majha

Dharmarakshak Ahilyadevi Holkar Movie: आजवर बऱ्याच दैवी शक्तींनी धर्माचं रक्षण आणि अधर्माचं निर्दलन करण्यासाठी भूतलावर अवतार घेतलेत. पुराणांपासून इतिहासापर्यंत ठिकठिकाणी याची उदाहरणं पाहायला मिळतात, पण काही मानवी शरीरधारी महात्मे धर्माचं रक्षण करता करता स्वत:च देवपदाला पोहोचले. सतराव्या शतकातील महाराणी अहिल्यादेवी होळकर या त्यापैकीच एक. याच थोर महाराणींची यशोगाथा 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर - एक युग' या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 23 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

निर्माते सोमनाथ शिंदे यांनी लयभारी प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार केलेल्या 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाची प्रस्तुती नितीन धवणे फिल्म्स यांनी केली आहे. नितीन धवणे पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते तसेच प्रस्तुतकर्ते आहेत. वीर पराक्रमी महिला योद्ध्याची अद्भुत यशोगाथा दाखवण्यासाठी रसिकांना सतराव्या शतकात नेणाऱ्या सुशांत सोनवले यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. पूर्वीच्या काळी स्वातंत्र्य, रणधुमाळी आणि रणसंग्रामाचा विचार म्हणजे काय? याची अचूक व्याख्या सांगत 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो. युद्धाची धुमश्चक्री सुरू असते आणि एक मराठा मावळा प्राणपणाने लढत असल्याचे दिसते. 'धनगराची लेक एक दिवस मराठा साम्राज्याचा भगवा सातासमुद्रापार फडकवेल', असे म्हणत लहानग्या अहिल्यादेवींची एन्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेल्या शपथेप्रमाणे अहिल्यादेवी एक शपथ घेतात आणि गनिमावर तुटून पडतात. शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या अहिल्यादेवींनी 12 ज्योतिर्लिंगे तसेच चार धामांसह हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धर्माच्या रक्षणासाठी जे गरजेचे होते ते केले. गनिमाला मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवणाऱ्या जिगरबाज महाराणीची चित्तथरारक गाथा 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे संकेत देणारा ट्रेलर चित्रपटाबाबत उत्कंठा वाढवणारा आहे. 'हिंदू हा फक्त धर्म नाही, तर जगाला शिकवण देणाऱ्या आमच्या तुकोबारायांची गाथा आहे', हा आणि असे बरेच अर्थपूर्ण संवाद चित्रपट पाहताना अंगावर रोमांच आणणारे आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं इ. स. 1767 ते इ. स. 1795 या काळात राज्य करणाऱ्या भारतातील माळव्यातील तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाईंची कहाणी चित्रपट रूपात जगासमोर येणार आहे. सिनेमाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले एक सुवर्ण युग 23 मे रोजी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

कधी चित्रपट, तर कधी मालिकांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारी रसिकांच्या परिचयाची असलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे या चित्रपटात अहिल्यादेवींच्या भूमिकेत आहे. तिच्या जोडीला मराठी सिनेविश्वातील मातब्बर कलाकार आहेत. यात राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, संजय खापरे, सुनील गोडसे, संजीवनी जाधव, शिवा रिंदानी आदी कलाकारांचा समावेश आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि प्रियांका शेंडगे यांनी लिहिलेली गीते संगीतकार शुभम पाटणकर यांनी नंदेश उमप आणि सागर भोसले यांच्या पहाडी आवाजात संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील नंदेशच्या आवाजाती पोवाडा रसिकांच्या अंगावर रोमांच आणणारा ठरेल. विनोद राजे यांनी डीआय, ओम पाटील यांनी संकलन, तर सलमान मुलानी आणि सुनीत व्यास यांनी व्हिएफएक्स केले आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते दादा शिंदे आणि धनाजी शिंदे आहेत.

पाहा ट्रेलर :

Published at : 13 May 2025 01:19 PM (IST)

Tags :

AhilyaDevi Holkar MARATHI MOVIE

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारत अंगावर पिणारं बाळ, वर्षभराच्या चिमुकल्याला सोडून आई सीमेवर निघाली, महाराष्ट्राच्या वाघिणीला देशाचा सलाम! बुलढाणा मोदींच्या निर्णयाला विरोध करणारे पाकिस्तानधार्जिणे, परकीय लोकांचे हस्तक; स्वामी गोविंदगिरी महाराजांची विरोधकांवर टीका विश्व इस्रायलने गाझामधील मेडिकल कॉम्प्लेक्स अन् विद्यापीठाच्या इमारतीवर बॉम्ब टाकले, एका पत्रकारासह 39 जणांचा मृत्यू भारत मोठी बातमी! शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घुसले, भारतीय सैन्याने परिसराला घातला वेढा

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 10 Photos निक्की तांबोळी-अरबाजने मर्यादा ओलांडल्या, 10 फोटो शेअर, तिसऱ्या आणि 6 व्या फोटोने कहर केला!
करमणूक 7 Photos अनुष्काने केली इंस्टाग्रामवर ही पोस्ट, आर्मीचे जवान आमच्यासाठी हिरो आहेत, विराट कोहलीने केली पोस्ट लाईक
करमणूक 9 Photos Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेचा देसी अंदाज; साडीत दिसतेय खास!

ट्रेडिंग पर्याय

मराठा... त्या काळी फक्त जात नसून विचार होता; 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाचा ट्रेलर (20)

अभय पाटील

CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

Opinion

मराठा... त्या काळी फक्त जात नसून विचार होता; 'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' चित्रपटाचा ट्रेलर (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Prof. An Powlowski

Last Updated:

Views: 5501

Rating: 4.3 / 5 (64 voted)

Reviews: 87% of readers found this page helpful

Author information

Name: Prof. An Powlowski

Birthday: 1992-09-29

Address: Apt. 994 8891 Orval Hill, Brittnyburgh, AZ 41023-0398

Phone: +26417467956738

Job: District Marketing Strategist

Hobby: Embroidery, Bodybuilding, Motor sports, Amateur radio, Wood carving, Whittling, Air sports

Introduction: My name is Prof. An Powlowski, I am a charming, helpful, attractive, good, graceful, thoughtful, vast person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.